|| श्री ||
श्री पेशवेकालीन पाश्र्वभूमी लाभलेला अणजूरचा गणपती

माघी गणेशजयंतीच्या आठवडाभर अगोदर गणपती अथर्वशीर्षाची आवर्तने सुरू होतात. पहाटेच्या रम्य वातावरणात मंत्रघोष घुमु लागताच वातावरण भारून जाते. अशा भारलेल्या, भक्तीमय, मंत्रमुग्ध वातावरणात प्रत्यक्ष गणरायाचे अस्तित्व जाणवल्याशिवाय रहात नाही. आवर्तनांसोबत गणेश याग केला जातो.