|| श्री ||
श्री पेशवेकालीन पार्श्वभूमी लाभलेला अणजूरचा गणपती

300 वा श्री मूर्ती स्थापना दिन

कर्ळावण्यास आनंद होतो की, या वर्ष मार्गशीर्ष शु. 6 (चंपाषष्ठी) 13 डिसेंबर 2018 ह्या दिवशी ह्या स्वयंभू श्रींच्या मूर्तीला या अणजूर येथील देवस्थानात स्थापना दिनाला बरोबर 300 वर्ष पूर्ण होतील.300 वर्षाचे औचित्य साधून त्या दिवशी मोठा धार्मिक उत्सव करण्याचे योजिले आहेत. भाविकांनी कृपया याची नोंद घ्यावी.

विश्वस्थ मंडळ

श्री सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट, अणजूर


अणजुर ते मोरगाव पायी प्रवास

इतिहास अभ्यासक डॉ श्री दत्त राऊत ८ एप्रिल 2018 सकाळी ८ वा पासून श्री सिद्धीविनायक अणजुर येथून ते पुणे मोरगाव असा पायी प्रवास सुरू करीत आहेत. या प्रवासात गंगाजी नाईकांनी निवडलेल्या व साष्टीच्या बखरीत नमूद असलेला अणजुर, कर्जत, खंडाळे घाट, चिंचवड, पुणे, जाधवरायाची वाडी, जेजुरी, मोरगाव असा प्रवास श्रीदत्त राऊत पायी चालत करणार आहेत. जुन्या संदर्भाप्रमाणे तब्बल १४३ मैलाचा प्रवास (२३० कि. मी) असा पायी प्रवास असेल.

श्री राऊत यांच्या अणजुर भिवंडी ते मोरगाव या प्रवासासाठी समस्त अंजूरकर नाईक परिवार अ ण जू र येथे हजर राहून त्याना शुभेच्छा द्यावे ही विनंती. तब्बल ३०० वर्षांनंतर होणारी ही अनोखी इतिहासाची पूर्नबांधणी होय ।

सदर मोहिमेसाठी शुभेच्छा हेच या ऐतिहासिक मोहिमेचे यश आहे असे आम्ही मानतो.