|| श्री ||
श्री पेशवेकालीन पाश्र्वभूमी लाभलेला अणजूरचा गणपती

ह्या देवस्थानचा संपूर्ण खर्च रजिस्टर झालेल्या ‘श्री सिध्दिविनायक देवस्थान ट्रस्ट, अणजूर’ तर्फे केला जातो. तरी सर्व गणेश भक्तांना नम्र विनंती आहे की, जर त्यांना सदर देवस्थानासाठी काहीही मदत करण्याची इच्छा असल्यास त्यांनी त्यांचे पैसे देवखोलीत ठेवलेल्या ‘दान पेटी’तच अर्पण करावे. पुजेच्या ताटात किंवा देवासमोर ठेवू नयेत. ज्यांना देणगीची पावती पाहिजे असेल तर ती दिली जाईल. परंतु त्यासाठी देणगीची रक्कम रु.50/- पेक्षा कमी असू नये. पाचशे रूपयांवरील देणगी धनादेशानेही स्वीकारली जाईल. धनादेश (चेक) ‘श्री सिध्दिविनायक देवस्थान ट्रस्ट, अणजूर’ नावे असावा व तो क्रॉस ऑर्डर करावा. देवस्थानात वस्तू ठेवण्यास जागा नसल्याने भाविकांनी वस्तू रूपाने भेट देवू नये.


समस्त अणजूरकर नाईक कुटुंबियांचे हे(खाजगी) देवस्थान श्री सिध्दिविनायक देवस्थान ट्रस्ट, अणजूर या नावाने सहाय्यक धर्मादाय आयुक्त ठाणे विभाग, ठाणे यांच्या कार्यालयात दिनांक 17-11-2000 रोजी नोंदणी करण्यात आले(नोंदणी क्रमांक ए-1116 ठाणे) तसेच आफिस आफ दि कमिशनर आँफ इन्कम टॅक्स, ठाणे यांच्या कार्यालयात इन्कम टॅक्स अक्ट 1961 सेक्शन 12 अ() अन्वय दिनांक 20-3-2001 रोजी नोंदणी झाली.( नोंदणी क्रमांक टी- 213) त्याचप्रमाणे चीफ कमिशनर आँफ इन्कम टॅक्स, पुणे यांच्या कार्यालयातून दिनांक 15-10-2001 रोजी ट्रस्टला Permanent Account Number (PAN) मिळाला आहे तो "AACTS 1662 C" आहे.


या देवस्थानला 284 वर्षे झाली आहेत व ज्या वास्तूत हे देवस्थान वसले आहे ती वास्तू 350 वर्षांपूर्वीची आहे. अशा देवस्थानचे पावित्र्य आजपर्यंत राखण्यात आले आहे. दिनांक 1-1-2001 पासून देवस्थानचा संपू्र्ण कारभार, खर्च 'श्री सिध्दिविनायक देवस्थान ट्रस्ट, अणजूर' रजि. क्रमांक ए-1116(ठाणे) तर्फे केला जातो.

कायम निधी देणगी आपण आपल्या स्वतःच्या नावावर किंवा नातेवाईक /आप्तेष्ट ह्यांच्या नावावर स्थापन करू शकता. हा निधी कुठल्याही आंनदी प्रसंगी उदाहरणार्थः वाढदिवस, मुंज, लग्नाचा वाढदिवस किंवा आप्त स्वकीयांच्या स्मरणार्थ ही देऊ शकता. प्रत्यक्ष कायम निधीला एक कायमस्वरूपी क्रमांक दिला जातो व आपण जीवनभर त्यात देणगी देऊ शकता.

कायम निधीत जमा केलेली रक्कम श्री सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट दर वर्षा बँकेत गुंतवून व त्याच्या येणा-या व्याजातून देवस्थानच्या दैनंदिन खर्चासाठी वापरला जातो. कायम निधीमध्ये आपण दिलेल्या देणगीवर सध्या ट्रस्टला इन्कम टॅक्स लागत नाही.

कायम निधी करण्यासाठी सोबतचा फॉर्म भरून देण आवश्यक आहे. आपण नवीन कायम निधी स्थापन करण्यासाठी देणगी कमीत कमी रक्कम रू. 1,000 /- देणे आवश्यक आहे. त्या नंतर निधीत भर घालणे असल्यास ती कमीत कमी रक्कम रू. 500 /- असावी. ही रक्कम आपण वार्षिक किंवा आपल्यीला योग्य वाटेल त्यावेळेस देऊ शकता.

कायम निधीमध्ये देणगी रोख किंव धनादेश किवं वँक ट्रस्ट, अणजूरला देणगी देताना आपण खालील दिलेल्या माहितीचा उपयोग करवा. (धनादेश (चेक) श्री सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट, अणजूर Shree Siddhivinayak Devasthan Trust, Anjur नावे असावा व तो क्रॉस ऑर्डर करावा.)

  • बँकेचे नाव : Bank of Maharashtra
  • खाते क्रमांक : Saving A/c. No.20079654432
  • शाखा :Bahavanishankar Raod Branch,
  • संपूर्ण पता : Bahavanishankar Raod, Dadar(W),Mumbai :-400028.
  • IFSC : MAHB0000132

NEFT ने देणगी देणा-यांनी आपला तपशील (नाव, देणगीची रक्कम, देणगीचा विनियोग, संपूर्ण पतासाहित) anjur.siddhivinayak@gmail.com या ई-मेलदारे कळवावा. देणगीदारांना पावती पोष्टादारे पाठविण्यात येईल. देणगी किंवा कायम निधी देणगी रोख रक्कम रकमेत किंवा बँक ट्रान्सफरने (NEFT) देण्यात यावी. देणगी रक्कम रू. 50 /- किंवा त्याहून अधिकसाठी पावती देण्यात येईल.देणगी रक्कम रू.2000 /- हून अधिक देणगी असेल तर ती फक्त धनादेश किंवा बँक ट्रान्सफरने (NEFT) स्वीकीरली जाईल ह्याची भाविकानी नोंद घ्यावी.

विश्वस्थ मंडळ

श्री सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट, अणजूर

नमस्कार, आता आपण QR CODE वापरून श्री सिद्धीविनायक देवस्थान अंजूर ला देणगी अर्पण करू शकत आहात, धन्यवाद

देणगी देण्यासाठी खालील जागी आपली माहिती भरा. आम्ही आपणास संपर्क साधू.

कायम निधी देणगी / Corpus Donor Form

नाव:
उद्देश:
मोबाइल / टेलिफोन:
ईमेल:
देणगी रक्कम:
पत्ता: