|| श्री ||
श्री पेशवेकालीन पाश्र्वभूमी लाभलेला अणजूरचा गणपती

श्री सिध्दिविनायक देवस्थान ट्रस्ट, अणजूर


रजिस्ट्रेशन नं. ऐ -१११६ (ठाणे)


।। श्री सिध्दिविनायक प्रसन्न ।।



भक्तजनांस जाहीर आवाहन


भाविकांचा वाढता ओघ, देवस्थानकडून सोयीसुविधांबाबत वाढत्या अपेक्षा यावर गांभीर्याने विचार करून श्रींच्या प्रेरणेने गणेशभक्तांच्या सोईकरीता देवस्थानच्या समोरच देवस्थानच्या मालकीच्या भूखंडावर ५० × ५० चौ. फुटांची वास्तू उभारण्याचे योजिले आहे.


या संकल्पास अंजूर ग्रामपंचायतीकडून मंजूरी मिळाली आहे. या वास्तूमध्ये भाविकांना विसावा घेता येईल. पिण्याचे पाणी, शौचालय अशा मूलभूत सेवा व इतर सोई सुविधा पुरविल्या जातील. सदर वास्तू बांधण्याच्या कामाची निविदा ऑगस्ट २०१४ मध्ये प्रसिध्द करण्यात येणार आहे.


तरी सर्व भाविकांना नम्र विनंती करण्यात येत आहे की त्यांनी यथाशक्ती श्रींच्या कार्यास सढळ हस्ते आर्थिक मदत करावी.


विश्र्वस्त मंडळ


श्री सिध्दिविनायक देवस्थान ट्रस्ट, अणजूर