अणजूरकर नाईक बंधु व भगिनी ह्यांची वार्षिक सभा भाद्रपद चतुर्थी,शुक्रवार, दि. १० सप्टेंबर २०२१ रोजी दु. २ वा अणजूर येथे देवस्थान मध्ये भरणार आहे.
सभेचा कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल :
१. आपल्या सर्वांचे आदरणीय विश्वस्त कै. शशिकांत शामराव नाईक व कै. सुरेश चिंतामण नाईक ह्यांचे साल २०२० व २०२१ मध्ये देहवासन झाले व त्यांना श्रद्धांजली वाहणे, तसेच साल २०१९ ते २०२१ ह्या कालावधी मध्ये इतर अणजूरकर नाईक बंधु व भगिनी ह्यांचा मृत्यु झाला आहे त्या सर्वांना श्रद्धांजली वाहणे
२. मागील वार्षिक सभेची टिप्पणी सभे पुढे वाचन करणे
३. आर्थिक साल २०१९-२० व २०२०-२१ ह्या वर्षांचे हिशोब तपासणीस श्री देवेन पाटील ह्यांनी तपासलेला जमा- खर्च व टाळे बंद सभे पुढे मांडणे
४. श्री देवेन पाटील ह्यांची आर्थिक वर्ष २०२१-२२ ह्या साल साठी हिशोब तपासणीस म्हणून नेमणूक करणे व त्यांचे मानधन ठरवणे
५.आपल्या माडी मध्ये होत असलेली छप्पर मधून पावसाळ्यात पाणी गळती वर दुरुस्ती साठी विचार विनिमय करून कारवाही करणे
६. येणाऱ्या पारंपारिक उत्सव ची तैयारी वर विचार विनिमय करणे
७. अणजूर येथे देवस्थान वास्तू मध्ये धार्मिक विधी श्री गणेश याग व वास्तु शमन करण्या बद्दल विचार विनिमय करणे व कारवाई करणे
८. विश्वस्त मंडळ मध्ये रिक्त जागा भरणे
९.अध्यक्ष ह्यांच्या परवानगी ने इतर कार्यक्रम करणे
आपला नाईक बन्धु
संतोष नाईक
कार्यवाह
*श्री सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट अणजूर*
*टिप*:
अ) प्रसाद भोजन ची व्यवस्था होणार नाही आहे, तेव्हां प्रत्येकाने स्वता साठी अल्पहार किंवा शिदोरी आणावी ही विनंती
ब ) सभा दु .४ वाजे पर्यन्त चालु राहील व त्याप्रमाणे तैयारी ने यावे
क) ज्याना प्रवास करता येणार नसेल त्यानी दुर्ध्वनी वरुन ऑनलाइन सभे मध्ये सहभाग घ्यावा किंवा त्यांनी अध्यक्ष ह्यांना त्यांची सूचना पाठवावी
ड) सभेत येताना करोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी नियम सर्वांनी पाळणे व त्याप्रमाणे स्वता चा मास्क वापरणे, दोन व्यक्ती मध्ये सोशल डिस्टनसिंग ठेवणे व हॅण्ड सॅनेटाईजर वापरणं जरुरी आहे
इ) सभेत नियत वेळे पासून १५ मिनिटे गणसंख्या नसल्यास सभा स्थगित करून ती पुन्हा १५ मिनिटांनी भरण्यात येईल व त्या सभेला गणसंख्या ची आवश्यकता लागणार नाही